Crop insurance collected : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला बीड
जिल्ह्यातील तब्बल 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला.महाराष्ट्राचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री
यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आता पाळलेला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे बीड जिल्ह्यातील
शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.तेथील नुकसान भरपाई करण्यासाठी व बीड जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा देखील मंजूर करण्यात आला होता.कृषी
मंत्र्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे तो दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना वितरित सुद्धा केला जाणार होता. त्याप्रमाणे
कालपासून म्हणजेच 13 नोव्हेंबर पासून बीड जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला आहे.
हेही वाचा : Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची असून अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर
येत आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास आहे.
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीन बाजारभावात मोठी सुधारणा, दिवाळीनंतर भावात आणखी वाढ होणार आहे का ?
Crop insurance collected या पिक विम्याचा लाभ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांनी
सोयाबीनचा पिक विमा उतरला होता. अशा शेतकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला आहे. बीड जिल्ह्यामधील
सात लाख 70 हजार शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरलेला होता.त्यापैकी 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांना 13
नोव्हेंबर दरम्यानच पिक विम्याचे पैसे देखील वितरित करण्यात आलेले आहेत. उरलेल्या दीड लाख शेतकऱ्यांना लवकरच पिक
विम्याचे पैसे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वितरित
झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आता सध्या पाहायला मिळत आहे.