शिंदे सरकारचं शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ लाभ

Eknath shinde : पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या

अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार खूप मोठी वाढ करण्यात येणार आहे.मुंबई : राज्यातील

जवळपास सुमारे 35 लाख शेतकऱ्यांसाठी (Farmers) कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नेमक

दिवाळीच्या तोंडावर अत्यंत गोड बातमी आणली आहे आणि , राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700

कोटी रुपये पीकविमा (Crop Insurance) अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध

जिल्ह्यातील तब्बल 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर

थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळी (Diwali 2023) पूर्वीच

पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

ओबीसी संघटनाही करणार न्यायालयीन संघर्ष

खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Eknath shinde : एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71

लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाआहे.अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा

कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश

कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केले आहे . अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत

संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केलं आहे. तसंच जसजसे अपिलांचे निकाल

येतील,त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन, अग्रीमचा तिढा तातडीने

सोडवण्याबाबत विनंती केली . त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीकविमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण

करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा

पवार हेही विम्याबाबत सातत्याने आग्रही होते. या सर्वांचेच धनंजय मुंडे यांनी आभार मानले होते .

तसंच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण आणि अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला

सूचना केलेल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?

नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (155.74 कोटी)जळगाव – 16,921 (4 कोटी 88 लाख)

अहमदनगर – 2,31,831 (160 कोटी 28 लाख)सोलापूर – 1,82,534 (111 कोटी 41 लाख)सातारा – 40,406 (6 कोटी 74 लाख)

सांगली – 98,372 (22 कोटी 4 लाख)बीड – 7,70,574 (241 कोटी 21 लाख)बुलडाणा जिल्हा – 36,358 ( 18 कोटी 39 लाख)

धाराशिव – 4,98,720 (218 कोटी 85 लाख)अकोला जिल्हा – 1,77,253 ( 97 कोटी 29 लाख)कोल्हापूर – 228 ( 13 लाख)

जालना जिल्हा – 3,70,625 ( 160 कोटी 48 लाख)परभणी – 4,41,970 (206 कोटी 11 लाख)

नागपूर – 63,422 (52 कोटी 21 लाख)लातूर – 2,19,535 (244 कोटी 87 लाख) अमरावती – 10,265 (8 लाख)

Maratha reservation : “२४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा जाहीर इशारा

Leave a Reply

error: Content is protected !!