Loan Information:- जीवनामध्ये केव्हा कोणता प्रसंग येईल हे आपल्याला अजिबात त्याबद्दल काही सांगता येत नाही. त्यामुळे
अचानक खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासत आहे
.परंतु आपल्याकडे पैसे वेळेवर उपलब्ध असतील असे बऱ्याचदा होत नाही .व अशा कालावधीमध्ये बऱ्याच व्यक्ती बँकांकडून किंवा
इतर मार्गाने पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत .परंतु जर आपण बँकांचा विचार केला तर बँकांच्या माध्यमातून
वैयक्तिक कर्ज जर घेतले तर त्याचा व्याजदर हा जास्त असल्यामुळे बऱ्याचदा आपल्यावर आर्थिक बोजा पडतो व
आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या ऐवजी जर तुम्ही इतर कर्जाच्या पर्यायांचा वापर केला तर ते तुम्हाला
अर्ज करण्याची शेवटची संधी – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 25 लाख पगाराची नोकरी, पदवीधरांनो त्वरित अर्ज करा | SBI Recruitment 2023
सहजतेने कर्ज मिळवून देण्यासाठी मदत तर करतातच परंतु पर्सनल लोन च्या तुलनेमध्ये तुम्हाला व्याजदर देखील कमी लागत
आहे. त्यामुळे तुमच्या पैशांची गरज तर भासतेच परंतु, व्याजदराच्या रूपाने दिला जाणारा अधिकच्या पैशाची बचत
देखील होत आहे .
पर्सनल लोनऐवजी कर्जासाठी वापरा हे पर्याय
Loan Information:- 1- मुदत ठेव अर्थात एफडीवर कर्ज– तुम्ही जर कुठल्याही
बँकेमध्ये एफडी केलेली आहे .तर तुम्ही त्या एफडीच्या माध्यमातून कर्जाची सुविधा मिळवू शकतात. तुम्ही बँकेमध्ये जी
काही एफडी केलेली असते तिच्या एकूण मूल्याच्या 90 ते 95 टक्क्यांपर्यंत तुम्हाला कर्ज सुविधा पण मिळू शकते.एफडी वर
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फी देखील भरावी लागत नाही. फक्त यामध्ये तुमच्या एफडीवर तुम्हाला जे काही व्याज
मिळते त्या ऐवजी तुम्हाला एक ते दोन टक्के जास्तीचे व्याज हे एफडी वरच्या कर्जावर द्यावे लागत आहे. तरी देखील एफडी
वरील कर्ज हे पर्सनल लोन पेक्षा तुम्हाला परवडत असते.2- सोनेतारण कर्ज अर्थात गोल्ड लोन– जर तुमच्याकडे सोने असेल
दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
तर तुम्ही या माध्यमातून कर्ज घेऊ शकत आहेत. जर आपण याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर दिलेल्या
माहितीनुसार , पाहिले तर तीन लाख रुपयांपर्यंतच्या गोल्ड लोन वर कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क तुम्हाला द्यावे लागत
नाही.गोल्ड लोन हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते व यामध्ये ही तुम्ही सोन्याच्या मोबदल्यात बँकेकडून कर्ज घेत आहेत . स्टेट बँक
ऑफ इंडियाचा विचार केला तर गोल्ड लोन वरील व्याजदर हा 8.70% पासून सुरु होत आहे. या व्याजदराची तुलना जर आपण
पर्सनल लोन वरील व्याजदराशी केली तर ते खूपच कमी आहेत .
3- पीपीएफवर कर्ज– समजा तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
अर्थात पीपीएफ खात्यामध्ये पैसे गुंतवले असतील तर या माध्यमातून देखील तुम्हाला कर्ज मिळत आहे. परंतु या सुविधेचा
जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याकरिता तुमचे पीपीएफ खाते किमान एक वर्ष जुने असणे गरजेचे आहेत. या माध्यमातून
तुम्हाला जे काही कर्ज दिले जाते आहे . ते पीपीएफ खात्यामध्ये तुमचे जमा रकमेचा आधारावर तुम्हाला मिळत आहेत.पीपीएफ
कापसाचे दर ८ हजारांच्या उंबरठ्यावर!
खात्यावरील घेतलेल्या कर्जावरील व्याज हे पीपीएफ खात्यावरील व्याजापेक्षा एक % जास्त असते. म्हणजे तुम्ही पीपीएफ खात्यात
केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1% दराने व्याज मिळत असेल तर या पीपीएफ खात्यावरील कर्जावर तुम्हाला 8.1% इतके व्याज
द्यावे लागेल. विशेष म्हणजे तुम्हाला 36 हप्त्यांमध्ये हे कर्ज फेडणे गरजेचे आहेत .अशाप्रकारे तुम्ही पर्सनल लोन ऐवजी जर या
तीनही पर्यायांपैकी एकाचा वापर केला तर तुम्ही जास्तीच्या व्याजदरापासून स्वतःचा बचाव करू शकतात.