Maharashtra Rain Update : पुण्यासोबत राज्यात अनेक ठिकाणी गारपीट! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यात पावसाची जास्त शक्यता

Maharashtra Rain Update :ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाबरोबर जोरदार गारपीट

झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हलका

ते मध्यम स्वरूपाचे पावसाबरोबर गारपीट झाली. नाशिकच्या ग्रामीण भागात देखील गारपीटीबरोबर पाऊस झाला

आहेपूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग झाला आणि कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र,

मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर

हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची जास्त शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार

पावसासोबत गारपिटीची देखील जास्त शक्यता आहे.येत्या तीन तासांत पावसाची शक्यतायेत्या तीन तासांत सुद्धा काही ठिकाणी

मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीबरोबर मुसळधार सरी कोसळण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे,

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर. तर पश्चिम

महाराष्ट्रात पुणे याबरोबर मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची जास्त शक्यता आहे.

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात पडणार अवकाळी पाऊस; केव्हा पडेल , तुमच्याकडे कस राहू शकेल हवामान ?

Maharashtra Rain Update : नाशिकमध्ये पावसाने झोडपले नाशिक जिल्ह्यातील कसबे, मौजे सुकेने आणि परिसरात बिगर मौसमी

पाऊस पडत आहे. तर सुकेने परिसरात गारांचा वर्षात झाला. याबरोबर सिन्नर परिसरातसुद्धा पाऊस कोसळत आहे. आठवडा

बाजार असल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली आहे. सुकेने, सिन्नरबरोबर चांदोरी परिसरामध्येही गारांचा पाऊस कोसळला

आहे. अवकाळी कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे

पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा मॅसेज ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा सविस्तर

Leave a Reply

error: Content is protected !!