Manoj Jarange : जरांगे पाटील पुन्हा सरकारला घेरणार! सांगितला नवा कार्यक्रम

Maratha Reservation Manoj Jarange Patil Tour : मराठा आरक्षणासाठी दोन वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे

पाटील पुन्हा एकदा सरकारला घेरणार असल्याचे दिसून येत आहे. उपचार घेतल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा रस्त्यावर

उतरणार आहेत. आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 9 दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.मराठा समाजाला सरसकट कुणबी

जात प्रमाणपत्र देण्यात यावे किंवा मराठा समाजाला स्वतंत्र टिकणारे आरक्षण द्यायला हवे , अशी मागणी जरांगे पाटील यांनी

केली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटलांनी दोन वेळा उपोषण केले आहे. आता 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ सरकारला दिला असून,

पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal anudan list

मनोज जरांगेंनी सांगितला कार्यक्रम

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याची घोषणा केलेली आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाच्या गाठीभेठी घेण्यासाठी दौरा

सुरू करत आहे. 15 ते 23 नोव्हेंबर पर्यंत दौरा असणार आहे.”असा आहे मनोज जरांगे यांचा दौरा15 नोव्हेंबरला वाशी,

परंडा, करमाळा.16 नोव्हेंबरला दौंड-मायणी.17 नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड.18 नोव्हेंबरला सातारा,

मेढा, वाई, रायगड.19 नोव्हेंबर रोजी रायगड दर्शन, पाचाड, महाड दर्शन, मूळशी, आळंदी होणार आहे.20 नोव्हेंबर रोजी तुळापूर,

पुणे (खराडी, चंदननगर), खालापूर, कल्याण.21 नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर.22 नोव्हेंबर रोजी विश्रांतगड,

संगमनेर, श्रीरामपूर.23 नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई आणि अंतरवाली होणार आहे.”चौथ्या टप्प्यात विदर्भ,

राहिलेला मराठवाडा आणि कोकण. सहा टप्पे असणार आहेत. सध्या साखळी उपोषण सुरूच आहे. पण, 1 डिसेंबरपासून

महाराष्ट्रातील एकही गाव असं असणार नाही की, जिथे साखळी उपोषण नसेल”, असे जरांगे पाटील म्हणाले.पैसे गोळा

करणाऱ्यापासून सावध रहा, जरांगेंचं महत्त्वाचं आवाहन”महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी, राजकारण्यांसाठी,

नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी, डॉक्टरांसाठी माहिती दिली आहे. आम्ही दोन दौरे केले आहे आणि तिसरा करणार

आहोत. यासाठी कुणाकडूनही एकही रुपया सुद्धा घेतला जात नाही. त्यामुळे जर कुणी पैसे मागितले, तर त्याला पैसे देऊ नका.

कारण स्वतःचा खर्च स्वतः करतो. आम्ही सावध करतोय. जर कुणी आमच्या नावावर किंवा मराठा समाजाच्या नावावर पैसे

घेतले असतील, तर लगेच माघारी मागावेत”, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

दुष्काळ अनुदान योजना बाकी राहिलेल्या तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

Leave a Reply

error: Content is protected !!