Modi Awas Gharkul Yojana : मोदी आवास घरकुल योजना, जातीच्या दाखल्यासाठी लाभार्थी आले मेटाकुटीला

Modi Awas Gharkul Yojana : मंगळवेढा – मोदी आवास घरकुल योजनेसाठी तालुक्याला १०८९ तारखेचे उद्दिष्ट दिले असले तरी त्या उद्दिष्टामधील अटीची पुर्तता

करताना लाभार्थ्याकडे ओबीसी जातीचा दाखला नसल्यामुळे अनेक लाभार्थी वंचीत राहण्याची शक्यता असून, वरिष्ठाच्या

प्रस्ताव सादर करण्याच्या तंबीने ग्रामसेवकांची दमछाक होत आहे.प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतून वंचित लाभार्थी वंचित

राहिल्यानंतर प्रपत्र ‘ड’ योजनेच्या माध्यमातून जवळपास 14 हजार लाभार्थ्यांची निश्चिती केली. त्यामधील गतवर्षी काही

घरकुलाला मंजुरी देण्यात आली. पण मात्र राहिलेल्या लाभार्थ्यांमधून प्राधान्याने ओबीसी लाभार्थ्यांसाठी मोदी आवास

घरकुल योजना आणली आहे.त्या संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामसभा घेण्यात आल्या. मात्र तालुक्यातील 27 ग्रामपंचायत

निवडणुका असल्याने उपसरपंच निवडीनंतर ग्रामसभा घेण्याबाबत सूचना दिल्या.पण मात्र त्यासाठी लाभार्थ्याकडे

जातीचा दाखला नसल्यामुळे दाखला काढण्यासाठी लाभार्थी मंगळवेढ्यास हेलपाटे मारू लागलेले आहेत.त्याआधीच मुख्य

कार्यकारी अधिकारी यांनी वेळेत प्रस्ताव दाखल करण्याची तंबी गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांना दिली आहे तरी देखील

लाभार्थ्यांकडे दाखले नसल्यामुळे लाभार्थी दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयाकडे पळापळ करू लागला आहे. तहसील

कार्यालयामध्ये जबाबदार अधिकारी कुणबीचे पुरावे शोधण्यात व्यस्त झालेले आहेत.तर दुसऱ्या बाजूला जातीचे दाखले सादर

करताना गरज असलेल्या पुराव्याची पूर्तता करताना मोठी अडचणीला सामोरे जावे लागते. त्यातच जातीच्या दाखल्याचे व

UPI Payment: आरबीआयचा मोठा निर्णय! यूपीआयद्वारे करता येणार 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट; पण…

उत्पन्न दाखल्याचे सर्वर संथ असल्यामुळे तेही लवकर निघू शकत नाहीत. लाभार्थ्याकडून प्रस्ताव दाखल नसल्यामुळे ग्रामसेवकही

मेटाकुटीला आले आहेत.अशा परिस्थितीत तालुक्यामध्ये या घरकुलाची उद्दिष्टपूर्ती करताना प्रशासनाला देखील अडचणीला

सामोरे जावे लागत आहे.Modi Awas Gharkul Yojana : तालुक्याला प्राप्त उद्दिष्टापैकी 340 दाखल प्रस्तावाची छाननी करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी

पाठवण्यात येईल. शनिवारी व रविवारी हे दोन सुट्टीच्या दिवसीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे आणि आणखीन जास्त

प्रस्ताव सादर होण्याची शक्यता जास्त आहे. सुट्टीच्या दिवशीही टोकनवर प्रस्ताव घेण्याचे सूचना ग्रामसेवकाला पंचायत समिती

प्रशासनाने दिलेले आहेत.ज्या लाभार्थ्याच्या शाळेच्या दाखल्यावर जातीचा स्पष्ट उल्लेख झालेला आहे. तो पुरावा मान्य करून इतर

महसुली पुराव्यासाठी अडवणूक न करता टोकन द्यावे लागेल . वेळेत जातीचे दाखले सोडण्यासाठी तत्पर्ता दाखवावी विनाकारण

अडवणूक करून विलंब करू नये यामुळे लाभार्थ्याची होणारी हेळसांड थांबवावी लागेल.

गृहकर्जावर SBI देत आहे मोठी सूट, माहिती करून घ्या कधी पर्यंत घेऊ शकता लाभ

Leave a Reply

error: Content is protected !!