Obc reservation:ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यास किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे, असे
शेंडगे यांनी नमूद केले आहे.मुंबई : ओबीसी संघटना दिवाळीनंतर रस्त्यावर उतरण्याबरोबरच आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये,
यासाठी न्यायालयीन संघर्षही करणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नाही आणि सरसकट कुणबी
प्रमाणपत्र देण्यास किंवा ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास समाजाचा विरोध आहे असं ओबीसी व धनगर समाजाचे नेते
प्रकाश शेंडगे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले आहे.मराठा आरक्षणाला किंवा त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास अॅड.
गुणरत्न सदावर्ते व काही जणांचा विरोध असून ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
पण काही ओबीसी संघटना त्यांच्याबरोबर नसून आमची भूमिका भिन्न आहे वेगळी आहे. मराठा समाजाला गेल्या वेळेप्रमाणे स्वतंत्र
संवर्ग करून आरक्षण देण्यास आम्ही विरोध केलेला नाही. पण मात्र ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यास किंवा
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा कायम विरोध राहणार आहे, असे शेंडगे यांनी नमूद केले.
Obc reservation :मराठा आरक्षणासाठी लढणारे प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी
ओबीसी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. ओबीसी समाजाला कायद्याद्वारे आरक्षण देण्यात
आले असून ते घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. गेली अनेक वर्षे ओबीसी समाजाला या आरक्षणाचा लाभ सुद्धा मिळत आहे. मग
इतक्या वर्षांनंतर ते बेकायदा असल्याचा दावा कसा केला जाऊ शकत आहे? आमच्या आरक्षणाला धक्का लागल्यास ते आम्ही
सहन करणार करणार नाही या याचिकेच्या सुनावणीत सहभागी होऊन ओबीसी संघटनाही बाजू मांडण्याची तयारी सध्या करीत
आहेत. दिवाळीच्या नंतर राज्यात सभा, मेळावे, उपोषण व धरणे आंदोलने सुरु करून ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावसाठी
जनजागृती केली जाणार आहे. ओबीसींची ताकद सरकारला मतपेटीतूनही दाखविली जाणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून
संघर्ष करण्याबरोबरच न्यायालयीन संघर्षात सुद्धा कमी पडणार नाही, असे शेंडगे यांनी स्पष्ट केले.