Oppo A2 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. फोनमध्ये १२जीबी रॅम, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा
आणि ५०००एमएएएचची बॅटरी मिळते. परंतु ह्यातील ५१२जीबी स्टोरेज लक्ष वेधून घेत आहे.ओप्पोनं आपला नवीन ५जी फोन
होम मार्केट चीनमध्ये आणलेला केलेला आहे. OPPO A2 5G हा स्मार्टफोन आज कंपनीच्या ऑनलाइन स्टोर Oppo मॉलवर लिस्ट
झाला आहे. ११ नोव्हेंबर पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे कंपनीनं असा दावा केला आहे की हा सगळ्यात
किफायतशीर ५१२ जीबी स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन आहे.
OPPO A2 5G ची किंमत
स्टोरेज मध्ये सादर झालेला आहे. यामधील १२जीबी रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,६९९ चायनीज युआन
(तब्बल १९,६४० रुपये) आहे. तर १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मॉडेल तुम्ही १,७९९ युआन मध्ये खरेदी करू शकणार
आहात ही किंमत २०,८०० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन ब्लॅक, पर्पल आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.
A2 भारतीय बाजारात येणार नाही कारण हा भारतातील OPPO चा रीब्रँड व्हर्जन आहे.
OPPO A2 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO मध्ये ६.७२ इंचाचा एलसीडी ब्रँड डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जो २४००x१०८० पिक्सल
रिजोल्यूशन, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ६८० निट्झ ब्राइटनेसला देखील सपोर्ट करतो. ह्या पंच
होल असलेल्या स्क्रीनला कंपनीनं पांडा ग्लासची सुरक्षा दिलेला आहे.फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेटची सुद्धा
ताकद देण्यात आली आहे. डिवाइसमध्ये १२जीबी एलपीडीडीआरएक्स रॅम देण्यात आला आहे. तसेच ५१२जीबी
पर्यंत यूएफएस २.२ मेमरी मिळते. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित कलर ओएस १३.२ वर चालत आहे.फोटोग्राफीसाठी कंपनीनं
ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी
सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर सुद्धा दिला आहे.पावर
बॅकअपसाठी ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३३वॉट फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी
ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर कनेक्टिव्हिट साठी वाय-फाय ५, यूएसबी सी पोर्ट आणि ३.५मिमी हेडफोन
जॅक मिळतो. हा फोन ड्युअल स्टिरिओ स्पीकर आणि आयपी५४ डस्ट व वॉटरप्रूफ रेटिंग सोबत आला आहे.