Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी
समोर आली आहे. खरंतर,आता सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनासाठी काबाडकष्ट करतायत.
शेतकऱ्यांची शेती-शिवारात लगबग चालू झाली आहे.काही ठिकाणी रब्बी हंगामातील गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी
देखील पूर्ण झालेली आहे तर काही ठिकाणी अजून पेरणीची कामे बाकी राहिलेली आहेत. ज्या भागात गव्हाची आणि हरभऱ्याची
पेरणी पूर्ण झाली आहे तेथील शेतकरी बांधव पीक वाढीसाठी आवश्यक असलेल्या कामांमध्ये गुंग आहेत.तथापि, काही भागात
यंदा रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होणार नाही असे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. कमी पावसामुळे राज्यातील काही
भागांमध्ये यावर्षी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार पेरणी
शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार पेरणी तर सोडाच पण काही भागात अक्षरशः पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सध्या
शेतकऱ्यांसहित राज्यातील सर्वसामान्य जनता चिंतेत आहेत पाहायला मिळत आहे.
येथे क्लिक करा
Panjabrao Dakh Havaman Andaj : दरम्यान दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा महाराष्ट्राला आता नेमक
हिवाळ्यात पाऊस ओलेचिंब भिपेरणीजवणार असे चित्र तयार होताना दिसून येत आहे. कारण की भारतीय हवामान खात्याने आगामी
काही दिवस राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार
पावसाची जास्त शक्यता वर्तवली आहे.यामुळे ज्या भागात मान्सूनकाळात कमी पाऊस पडला आहे, त्या भागासाठी हा
पाऊस फायदेशीर ठरणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत
आहे.पण उद्या उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात गारपीट होईल असा देखील
अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले
आहे.गारपीटमुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच जेष्ठ हवामान तज्ञ
पंजाबराव डख यांनी सुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांनी सांगितल्यानुसा, महाराष्ट्रात आजपासून
अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे.राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात 25
नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण मात्र हा अवकाळी पाऊस
राज्यात सर्वदूर पडणार नाही.म्हणजेच जर एखाद्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला तर काही भागात हवामान कोरडे
राहण्याची शक्यता आहे. दरम्यान या कालावधीत पडणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटाबरोबर पडेल असा अंदाज आहे. यामुळे
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.