PM Kisan Yojana: तारीख ठरली! ‘या’ दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे गोड

PM Kisan 15th Installment Date : पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

समोर येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे हस्तांतरण 15 नोव्हेंबर 2023 रोजी

होणार आहे.8 कोटी शेतकऱ्यांना 15 वा हप्ता DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. शेतकऱ्यांना

आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये

प्रतिवर्षी 6,000 रुपये दिले जातात.

सोयाबीन दर वाढणार लवकरच सोयाबीनचे दर दहा हजार होणार grow soyabeen rate

PM kisan 15th Installment

PM Kisan 15th Installment Date : 8 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार PM किसान योजना ही जगातील सर्वात मोठ्या

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (सरकारी लाभ थेट त्या व्यक्तीच्या खात्यात) योजनांपैकी एक आहे. ज्यामध्ये वार्षिक तीन

हप्त्यांमध्ये 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. PM

किसानचे 15 व्या हप्त्याचे 2,000 रुपये 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे

लाभार्थी यादीत आहेत त्यांनाच 15 वा हप्ता दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी लाभार्थी यादीत आपलं नाव तपासू

शकणार आहेत.ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच फॉर्ममध्ये दिलेले सर्व

तपशील बरोबर असावेत. त्यामुळे अर्जात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तुमचे पुर्ण नाव, वडिलांचे नाव, पत्ता, बँक

खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील जर चुकीचे असतील तर तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू

शकता.अधिक माहितीसाठी संपर्क करापीएम किसान योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan-ict@gov.in

वर ईमेल आयडी पाठवू शकता. याव्यतिरिक्त शेतकरी पीएम शेतकरी योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा

1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकत आहात.

दुष्काळ अनुदान योजना बाकी राहिलेल्या तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

Leave a Reply

error: Content is protected !!