SBI Recruitment 2023 मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या जागांची त्वरित भरती (SBI Recruitment 2023) केली
जाणार आहे. रिक्त पदांच्या भरती बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत
CGM आणि उपमुख्य डिजिटल अधिकारी (DB&T), उप व्यवस्थापक (सुरक्षा) / व्यवस्थापक (सुरक्षा), डेटा विश्लेषक
पदांच्या एकुण 47 रिक्त जागा भरण्यात येतील.यासाठी पदांप्रमाणे पात्र आहेत त्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत
आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (CGM आणि उपमुख्य डिजिटल
अधिकारी (DB&T)) 22 नोव्हेंबर 2023 आणि इतर पदांसाठी 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.उमेदवारांना SBI वेबसाइट
https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे
पदवीधरांना केंद्र सरकारकडून 60 हजार महिना पगाराची ऑफर, ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांसाठी होणार निवड | ITPO Recruitment 2023
ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.ऑनलाइन
नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी
केली जाऊ शकत नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर
सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या
तारखेप्रमाणे या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.