SIM Card : कार्ड खरेदी करताना Digital KYC गरज असणार आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशननं पेपर बेस्ड केव्हायसी १
जानेवारी २०२४ पासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला
आहे.डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमनं (डॉट) एक स्वागतार्ह निर्णय घेत घोषणा केली आहे की मोबाइल युजर एनरोलमेंटसाठी आता पेपर
बेस्ड KYC ची आवश्यकता नाही. हा बदल १ जानेवरी २०२४ पासून अंमलात आणला जाऊ शकणार आहे. त्यामुळे टेलिकॉम
कंपन्यांची प्रोसेस सुधारेल, खर्च कमी होईल तसेच सिम फ्रॉड कमी होणार आहे.सध्या जी प्रोसेस आहे ज्यात अनेक कागदी
फॉर्म भरावे लागतात, फोटो द्यावा लागतो आणि ओळखीचा तसेच पत्त्याच्या पुराव्याच्या कॉपी द्याव्या लागत आहे. ह्या प्रोसेसची
जागा पूर्णपणे डिजिटल केव्हायसी घेईल. त्यामुळे आता सिमकार्ड घेण्यासाठी सिमकडं आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी पुरावे सोबत
Jio-Airtel नव्हे तर ‘ह्या’ कंपनीनं लाँच केला २३ रुपयांचा रिचार्ज, जाणून घ्या संपूर्ण घ्या माहिती
नेण्याची आवश्यकता नाही तुम्ही डिजिलॉकर सारख्या अॅप्सचा सुद्धा वापर करू शकता.DoT नं जाहीर केलं
नोटिफिकेशनसध्याच्या केव्हायसी फ्रेमवर्कमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे आता ९ ऑगस्ट २०१२ च्या
सूचनेप्रमाणे चालू असलेली पेपर बेस्ड केव्हायसी प्रोसेस १ जानेवारी २०२४ पासून बंद केली जाणार, असं डिपार्टमेंट ऑफ
टेलीकॉम्युनिकेशननं मंगळवारच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे. इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट्सच्या मते ह्या बदलामुळे टेलिकॉम
कंपन्यांचा ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी होईल तसेच फसवणुकीच्या घटना कमी करण्यासाठी सरकारला सुद्धा मदत
होईल.ह्याआधी ऑगस्ट २०२३ मध्ये टेलिकॉम डिपार्टमेंटनं एक घोषणा केली होती आणि ज्यात सिम कार्ड विक्री करणाऱ्या
विक्रेत्यांसाठी नियम कडक करण्यात आलेले होते. त्यामुळे सिम कार्ड विक्रेत्यांकडून होणाऱ्या फ्रॉडला आळा असेल, असा उद्देश
आहे. हे नवीन नियम १ डिसेंबरपासून लागू देखील झालेले आहेत.Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea साठी
खुशखबरकेव्हायसीच्या नव्या नियमांमुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा लाभ होणार आहे. SIM Card : पेपर बेस्ड केव्हायसी रद्द झाल्यामुळे
डिजिटल केव्हायसी युजर एनरोलमेंटचा खर्च कमी करणार आहे. तसेच सरकारला सिम कार्ड फ्रॉडवर लक्ष ठेवण्यास सुद्धा मदत
होईल. सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी अनेकदा आपल्या ग्राहकांना सिम कार्ड संबंधित स्कॅम्सची सूचना देखील दिली आहे.