शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीन बाजारभावात मोठी सुधारणा, दिवाळीनंतर भावात आणखी वाढ होणार आहे का ?

Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची असून अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ही

बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास आहे.

हाती आलेल्या माहितीप्रमाणे सोयाबीन बाजारभावात दोन आठवड्यात तब्बल तीनशे रुपयांपर्यंतची वाढ झालेली

आहे.बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात गेल्या एका महिन्यांच्या काळात एक मोठी घडामोड

झाली आहे. जागतिक बाजारात सोया पेंडचे भाव सुद्धा तब्बल 20 टक्क्यांनी वाढले आहेत. याचा परिणाम असा झाला की

भारतीय सोया पेंडला देखील मागणी वाढली आहे.खरंतर अमेरिकन सोयापेंड पेक्षा भारतीय सोयापेंड सुद्धा आजही महागच

आहे. पण आशिया खंडातील देशांना भारतीय सोयापेंड अमेरिकेच्या सोया पेंड पेक्षा देखील स्वस्त पडत आहे. यामुळे

भारतीय मालाची मागणी वाढलेली आहे.हेच कारण आहे की देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात गेल्या दोन आठवड्यापासून

सुधारणार आहे हे दिसून येत आहे. सोयाबीनचे बाजार भाव आता 4600 ते 4800 एवढ्या सरासरी भाव पातळीवर येऊन थांबलेले

आहेत.पण दोन आठवड्यापूर्वी हेच बाजार भाव 4400 ते 4500 रुपये प्रति क्विंटल एवढे झाले होते. खरंतर ब्राझीलमध्ये कित्येक

ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. दुष्काळामुळे तेथील प्रमुख सोयाबीन उत्पादक भागांमध्ये

उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आहे.हेच कारण आहे की जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात गेल्या

एका महिन्यात तब्बल 10 टक्क्यांची आणि सोया पेंडच्या दरात 20 टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आलेली आहे. यामुळे

दुष्काळ अनुदान योजना बाकी राहिलेल्या तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

देशाअंतर्गत सोयाबीन बाजारभावात देखील सुधारणा झाली आहे.बाजार अभ्यासकांनी सांगितल्यानुसार भविष्यात सोया पेंड

बाजारभावात जागतिक बाजारात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. जागतिक बाजारात ही दर वाढ झाली तर भारतीय

सोया पेंडचे भाव आणखी वाढणार आहेत.त्यामुळे देशांतर्गत प्रक्रिया प्लांट्स मध्ये सोयाबीनची मागणी वाढणार आहे. यंदा

देशात अधिक प्रमाणात उत्पादन कमी झालेले आहेत यामुळे उद्योगांना आता सोयाबीनची खरेदी सुद्धा वाढवावी लागणार

आहे.उद्योगांना आता वाढत्या भावात माल खरेदी करावा लागणार आहे. म्हणून सोयाबीन बाजारभावात 500 ते 700 रुपयांपर्यंतची

सुधारणा होऊ शकते असा अंदाज दिसून येत आहे.

Soybean Market : येत्या दोन महिन्यात सोयाबीनचे भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल या

सरासरी भाव पातळीवर पोहोचतील असा अंदाज काही बाजार अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.

याच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार आहे .यादीत नाव पहा pik vima jama list

Leave a Reply

error: Content is protected !!