मस्तच! प्रवाशांची लालपरी झाली डिजीटल, एसटी तिकीटाचे पैसे ऑनलाइन सुद्धा देता येणार, खास सुविधा चालू

ST Bus : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी बसमध्ये आता प्रवाशांना तिकीटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. क्यूआर

कोडच्या मदतीने पैसे देण्याची सोय महामंडळाने केली आहे. ST Bus : पुणे:’राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसमध्ये

प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना ‘क्यूआर कोड’च्या मदतीने देखील

तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून, त्याचा फायदा

प्रवाशांबरोबरच महामंडळालाही होणार आहे. एसटीच्या पुणे विभागातील सर्व आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही

सुविधा करण्यात आलेली आहे.सध्याच्या जमान्यात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. चहावाल्यापासून ते मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहक

ऑनलाइन पैसे देत आहे. सर्व व्यवहारांत कॅशलेसवर जास्त भर देण्यात येत असताना देखील एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच

काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत असताना दिसून येत होती. हे

टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट

आणि क्रेडिट कार्डवरून देखील तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम

बाळगण्याची गरज भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका होणार आहे. महामंडळाने

Modi Awas Gharkul Yojana : मोदी आवास घरकुल योजना, जातीच्या दाखल्यासाठी लाभार्थी आले मेटाकुटीला

सर्व विभागांना ही सेवा चालू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.प्रवाशांसाठी हेल्पलाइनची सुरुवातऑनलाइन तिकीट

काढताना रक्कम वजा झाल्यास आणि तिकीट न मिळाल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाकडून ‘४००’ या क्रमांकावर

हेल्पलाइन चालू करण्यात आली आहे. प्रवासी ८८००६८८००६ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकणार आहात.

याव्यतिरिक्त wecare@aritelbank.com येथे संपर्क साधूनही मदत मिळवता येऊ शकणार आहे. हेल्पलाइनचे क्रमांक २४ तास

उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.’बसमध्ये माहितीफलक लावा’एसटीचे तिकीट

‘क्यूआर कोड’द्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. मात्र, अशा प्रकारची सेवा उपलब्ध केल्याची माहिती बसमध्ये

लावण्याची गरज आहे. त्यासाठी ‘क्यूआर कोड’द्वारे तिकीट काढण्याची सोय असल्याचे फलक बसमध्ये लावण्याची मागणी

प्रवाशांकडून सध्या केली जात आहे.एकूण आगार१३एकूण बससंख्या८४९मार्गावरील बस७५०सरासरी वाहतूकअडीच लाख

किलोमीटरदररोजची प्रवासी संख्यासुमारे दीड लाखदिवसाचे उत्पन्नसरासरी ~ एक कोटी

केलेला खर्च लपवून ठेवायचा आहे? Google Pay वरून अशी डिलीट करा ट्रँजॅक्शन हिस्ट्री, माहिती करून घ्या प्रोसेस

अश्याच माहितीसाठी किंवा कृषी माहितीसाठी लगेच ग्रुपला जॉईन व्हा 👇🏻👇🏻

👉🏻 येथे क्लिक करा 👈🏻

Leave a Reply

error: Content is protected !!