UPI Payment: आरबीआयचा मोठा निर्णय! यूपीआयद्वारे करता येणार 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट; पण…

UPI Payment Limit: जर तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार

करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI ने ही एक सर्वात मोठी घोषणा केली आहे. RBI

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI Payment द्वारे व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय मोठा घेतला आहे.RBI गव्हर्नर शक्तीकांत

खुशखबर ! आता Phone Pay देणार पर्सनल लोन, केव्हापासून चालू होणार नवीन सुविधा, जाणून घ्या सविस्तर

दास यांनी धोरणानंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे.

पण हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्ये देखील करता येणार आहेत.नोव्हेंबर 2023 मध्ये UPI व्यवहारांनी

17.4 लाख कोटी रुपयांचा नवा विक्रम केलेला होता. 2022 च्या तुलनेत, UPI द्वारे व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत 54 टक्के

आणि मूल्याच्या बाबतीत 46 टक्के वाढ झाली आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार,

टक्केवारीच्या बाबतीत व्यवहारांचे मूल्य महिन्याला 1.45 टक्क्यांनी वाढले आहे. सणासुदीच्या हंगामामुळे ग्राहकांच्या

खर्चात वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये व्यवहारांचे मूल्य 8.6% वाढले आणि व्यवहारांची संख्या 8.1% वाढली होती.महागाईचा

दर 4 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्यRBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त करत महागाईचा दर सौम्य

असला तरी अन्नधान्य महागाई दरात झालेली वाढ चिंताजनक असल्याचे सांगितलेले आहे. ते म्हणाले की, महागाईचा दर 4

टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आतापर्यंत आपण गाठू शकलो नाही. त्यासाठी काम करत राहावे लागेल. चालू आर्थिक वर्षाच्या

तिसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर 5.6 टक्के राहण्याची शक्यता आहे.

गृहकर्जावर SBI देत आहे मोठी सूट, माहिती करून घ्या कधी पर्यंत घेऊ शकता लाभ

Leave a Reply

error: Content is protected !!