Wheat Farming : गहू हे भारतात उत्पादित होणारे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे तसेच पिकाची राज्यातील विविध
जिल्ह्यांमध्ये पेरणी केली आहे. पंजाब, हरियाणा तसेक राजस्थान मध्यप्रदेश, बिहार यासह आपल्या महाराष्ट्रात सुधा गव्हाची
लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात गहू पिकाची कमी अधिक प्रमाणात पेरणी केली जाते.
हया वर्षी मात्र राज्यातील गहू लागवडी खालील क्षेत्र कमी होणार असा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी
काळात यावर्षी कमी पाऊस पडला असल्याने गव्हाची लागवडी खालील क्षेत्र कमी होणार आहे .तथापि ज्या शेतकऱ्यांकडे
पाण्याची साटन उपलब्ध आहे . ते शेतकरी यावर्षीही गव्हाची पेरणी करतील अस सांगितलं जात आहे. दरम्यान गव्हाच्या
विक्रमी उत्पादनासाठी त्याच्या सुधारित वाणांची लागवड करणे आवश्यक आहेत .यामुळे आज आपण गव्हाच्या काही सुधारित
जातींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण गव्हाच्या अशा जातींविषयी जाणून घेणार आहे . ज्या
जाती 120 – 130 दिवसात परिपक्व होतात . सरासरी 80 क्विंटल पर्यंतचे उत्पादन त्यातून मिळते. चला तर मग वेळ न
घालवता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप चालू आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance
गव्हाच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे
Wheat Farming : श्रीराम ३०३ – श्रीराम कंपनीची एक सुधारित जात आहे. ही जात सरासरी १५६ दिवसांत परिपक्व होत असते. म्हणजेच, गव्हाची ही जात
पेरणीनंतर साधारणता पाच महिन्यात काढण्यासाठी तयार होते. श्रीराम कंपनीचा हा वाण उच्च उत्पादनासाठी विशेष ओळखला
जातो. शेतकऱ्यांना या जातीपासून सरासरी हेक्टरी ८१.२ क्विंटल उत्पादन मिळत आहे . श्रीराम ३०३ ही गव्हाची जात पिवळा,
तपकिरी आणि काळा तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे च जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन
मिळते . शेतकऱ्यांना कमी उत्पादन खर्च लागतो.जीडब्ल्यू 322 – गव्हाचा हा वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आसून.
गव्हाचा हा वाण 3nते 4 पाणी भरले तरी चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहेत. गव्हाचा हा वाण प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये
उत्पादित केला जातो. यापासून सुमारे 60-65 क्विंटल उत्पादन मिळत आहे. हा वाण अंदाजे 115-125 दिवसांत परिपक्व होत
असतो. या जातीपासून श्रीराम 303 या जातीपेक्षा कमी उत्पादन मिळते मात्र तरीही हा वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला.
गव्हाच्या सुधारित जाती
पुसा तेजस 8759 – गव्हाची ही जात शेतकऱ्यांमध्ये अलीकडे विशेष लोकप्रिय बनली आहे. ही जात 110 ते 115 दिवसांत
तयार होत असते. ही जात जबलपूरच्या कृषी विद्यापीठात विकसित करण्यात आली आहे. जातीपासून हेक्टरी 70 क्विंटल
Drought In Maharashtra: दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळू शकतील ‘या’ सवलती! जाणून घ्या ए टू झेड माहिती
पर्यंतचे उत्पादन मिळत आहे.श्रीराम सुपर 111 – गव्हाची ही एक सुधारित जात आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये या
वाणाची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये देखील हा वाण अलीकडे विशेषता गेल्या दोन ते
तीन वर्षांपासून लोकप्रिय बनला आहे. विशेष म्हणजे हे वाण हलक्या जमिनीतही उत्पादित केला जाऊ शकतो. कोणत्याही
प्रकारच्या जमिनीत या वाणाची पेरणी ही करता येते. गव्हाचा हा वाण सरासरी 105 दिवसात परिपक्व होतो.ही 8498 : जबलपूर
येथील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी HI 8498 हि जात तयार केली आहे. हा वाण ज्या राज्यांमध्ये गव्हाची लागवड केली जात
आहे . तिथे ही उत्पादित होऊ शकतो. या जातीपासून प्रति हेक्टर 77 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा काही
शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातो . हा वाण सरासरी 130 दिवसांमध्ये परिपक्व होत आहे. तथापि उत्पादनाचा आकडा हा
सर्वस्वी शेतकरी नियोजन, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि जमिनीचा पोत या घटकांवर अवलंबून राहणार आहे.